Periods नंतर ‘ही’ 5 योगासने करा, वजन झपाट्याने कमी होईल – PCOD, पोटाची चरबी, तणाव कमी होईल!
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांना वाढलेलं वजन, PCOD/PCOS, तणाव आणि हार्मोनल असंतुलन अशा अनेक आरोग्य समस्या सतावत आहेत. मात्र, मासिक पाळीनंतर जर तुम्ही नियमित ‘ही’ 5 योगासने केली, तर शरीर आणि मन दोन्ही बळकट होईल आणि वजनही झपाट्याने कमी होईल.
मासिक पाळीनंतर योगासन का फायदेशीर?
पाळीनंतर शरीरातील हार्मोन्स सामान्य होत असतात. यावेळी जर योग्य योगासने केली गेली, तर ती फॅट बर्निंग प्रोसेसला गती देतात, पीसीओडी नियंत्रणात ठेवतात, आणि शरीराला डिटॉक्स करतात.
1. भुजंगासन (Cobra Pose)

चरबी कमी + पचन सुधारणा
- पोटावर झोपा.
- दोन्ही हात कोपरांपासून वाकवत छाती उचला.
- मान मागे वाकवा आणि खोल श्वास घ्या.
फायदे: पोटाची चरबी कमी होते, पाठीचा त्रास कमी होतो आणि पचनशक्ती वाढते.
पीरियड्स वेळेवर येत नाहीत? ही 3 आजारं शरीरात सुरू झाली असू शकतात!
2. सेतुबंधासन (Bridge Pose)

कंबर व गर्भाशय बळकट करणारे आसन
- पाठ टेकवत झोपा.
- गुडघे वाकवा आणि पाय जमिनीवर.
- कंबरेला वर उचला आणि हात जमिनीवर ठेवा.
फायदे: पाठीला ताकद, हार्मोन्स बॅलन्स, PCODमध्ये फायदा.
3. सूर्यनमस्कार (Sun Salutation)

Full Body Detox + Fat Loss
- 12 स्टेप्समध्ये हे योगासन केलं जातं.
- दिवसातून कमीतकमी 5 सूर्यनमस्कार करा.
फायदे: कॅलोरी बर्न, स्नायूंना ताकद, शरीर डिटॉक्स होते.
4. वज्रासन (Diamond Pose)

पचन सुधारणा + फॅट कटर
- जेवणानंतर 5 ते 10 मिनिटे वज्रासन करा.
- पाय मागे घेऊन गुडघ्यावर बसा, पाठ ताठ ठेवा.
फायदे: पचनक्रिया सुधारते, पोटाची चरबी कमी होते.
गॅसेसने पोट फुगलंय? ५ सेकंदात आराम मिळवणारा जबरदस्त उपाय!
5. सुखासनात प्राणायाम
मनशांती + तणावमुक्ती
- सुखासनात बसा आणि डोळे बंद करा.
- नाकाने श्वास घ्या आणि सोडा.
फायदे: तणाव कमी, मेंदू शांत, हार्मोनल समतोल राखतो.
योग करताना लक्षात ठेवा:
- पाळीनंतर शरीराला थोडा विश्रांती द्या आणि मगच योग सुरू करा.
- पहिल्या दिवशी हलकी योगासनेच करा.
- शुद्ध पाणी प्यायचं विसरू नका.
- जोर जबरदस्ती न करता, शरीराची मर्यादा समजून प्रगती करा.
- रोज फक्त 15–20 मिनिटे योगासने ही पुरेशी आहेत.