लिव्हरला घातक ठरणारे 6 पदार्थ – फक्त दारूच नाही, हे पदार्थही लिव्हर खराब करतात!
लिव्हर हे आपल्या शरीरातील सर्वात मोठं आणि महत्वाचं अंग आहे. ते अन्न पचवण्यास मदत करतं, विषारी घटक फिल्टर करतं आणि पचनासाठी आवश्यक एंझाइम्स तयार करतं. विशेष म्हणजे, लिव्हरमध्ये काही बिघाड झाल्यास ते स्वतःला रिपेयर करण्याची ताकद ठेवतं. मात्र, सततची चुकीची जीवनशैली आणि आहार लिव्हरला गंभीरपणे नुकसान करू शकतो.
जर आपण रोजचे काही अन्नपदार्थ सातत्याने खात असाल, व्यायाम करत नसाल, आणि शरीराची हालचाल कमी असेल, तर लिव्हर खराब होण्यास वेळ लागत नाही. पुढे जाऊन लिव्हर सिरोसिस, फॅटी लिव्हर, हेपेटायटिस अशा गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं.
तर, जाणून घ्या कोणते पदार्थ टाळल्यास आपलं लिव्हर हेल्दी राहू शकतं:

1. अल्कोहोल (दारू)
दारूचं सेवन लिव्हरसाठी सर्वात मोठा धोका आहे. यामुळे फॅटी लिव्हर, लिव्हर इन्फ्लमेशन (सुझ) आणि लिव्हर सिरोसिस होण्याचा धोका वाढतो. सतत दारू पिल्यास लिव्हरमध्ये कायमचा बिघाड होऊ शकतो.
2. फॅटी आणि तळलेले पदार्थ
बाजारात मिळणारे तळलेले स्नॅक्स, समोसे, बर्गर, आणि तेलकट पदार्थांमध्ये फॅटचं प्रमाण अधिक असतं. हे फॅट लिव्हरमध्ये साठू लागल्याने त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होण्याची शक्यता वाढते.
पीरियड्स वेळेवर येत नाहीत? ही 3 आजारं शरीरात सुरू झाली असू शकतात!
3. अती साखरयुक्त पदार्थ (High Sugar Foods)
कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस, मिठाया, बिस्किटं, आणि प्रोसेस्ड फूडमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. यामुळे लिव्हरवर सूज येते आणि ते योग्य प्रकारे काम करू शकत नाही.
4. पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड फूड्स
चिप्स, फ्रोजन फूड, नूडल्स, इंस्टंट सूप अशा वस्तूंमध्ये कृत्रिम रंग, प्रिझर्व्हेटिव्हज, आणि अनावश्यक साखर, मीठ व फॅट असतं. हे पदार्थ लिव्हरवर मोठा भार टाकतात.
5. रिफाइंड धान्य (मैदा)
मैद्यापासून तयार होणारे पदार्थ – ब्रेड, बिस्किट्स, पिझ्झा, केक – यामध्ये फायबर्स कमी आणि ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. हे पदार्थ लिव्हरला फॅटी लिव्हर कडे नेऊ शकतात.
6. अतिरिक्त मीठ (High Salt Intake)
अति प्रमाणात मीठ खाल्ल्यानं लिव्हरवर वाईट परिणाम होतो. हे पाणी धरून ठेवण्याची प्रक्रिया वाढवतं, ज्यामुळे लिव्हरचा कार्यक्षमतेवर परिणाम होतो. शिवाय, हाय ब्लड प्रेशरचाही धोका वाढतो.
लिव्हर वाचवायचंय? तर हे करा:
- दररोज 30 मिनिटांचा व्यायाम
- भरपूर पाणी प्या
- नैसर्गिक, कमी तेलकट आणि घरचं अन्न खा
- दारू, धूम्रपान आणि प्रोसेस्ड फूड टाळा
- दरवर्षी एकदा लिव्हर फंक्शन टेस्ट करून घ्या