कोरोनापेक्षाही मोठा धोका? चीनकडून अमेरिकेवर जैविक हल्ल्याचा गंभीर इशारा!
जगभरात कहर करणाऱ्या कोरोनाच्या संकटाला अजून विसरलं जात नाही तोच अमेरिकेसमोर आणखी एक नवे आणि घातक संकट उभं ठाकलं आहे. चीनबाबत सतत इशारे देणारे अमेरिकेचे वरिष्ठ तज्ज्ञ गॉर्डन चांग यांनी आता धक्कादायक दावा केला आहे – “अमेरिकेवर कोरोनापेक्षाही गंभीर जैविक हल्ला होऊ शकतो!”
बुरशी तस्करीचा उघडकीस आलेला कट
गेल्या काही दिवसांत दोन चिनी नागरिकांवर अमेरिकेत एक विषारी बुरशी फ्युसेरियम ग्रॅमिनेरम (Fusarium graminearum) याची तस्करी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ३३ वर्षीय युनकिंग जियान आणि तिचा प्रियकर जुन्योंग लिऊ या दोघांनी ही बुरशी अमेरिकेत आणण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. ही बुरशी गहू, मका, बार्ली आणि तांदळासाठी अतिशय घातक असून, ‘हेड ब्लाइट’ नावाचा रोग पसरवते. यामुळे केवळ पिकांचे नुकसान नाही, तर माणसांमध्ये उलटी, यकृताचे विकार आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

“कोविड आणि फेंटानिलपेक्षाही घातक!”
गॉर्डन चांग यांनी Fox News शी बोलताना या घटनेला अमेरिकेविरुद्ध युद्धाचा भाग असे संबोधले. त्यांनी म्हटले की, “जर अमेरिका सावध राहिली नाही तर तिला कोविड आणि फेंटानिल यांच्यापेक्षाही अधिक गंभीर संकटाचा सामना करावा लागू शकतो.” त्यांनी २०२० मध्ये चीनमधून आलेल्या रहस्यमय बियाण्यांची आठवण करून दिली, ज्यामध्ये संपूर्ण अमेरिकेत जैविक हल्ल्याचा संशय निर्माण झाला होता.
चीनच्या धोरणांबद्दल गंभीर इशारा
चांग पुढे म्हणाले, “आपण सामर्थ्यवान असूनही चीनकडून हरू शकतो, कारण आपण ठोस पावले उचलत नाही. चीनची कम्युनिस्ट सत्ता अमेरिकेला शत्रू मानते आणि ‘जनयुद्धा’च्या धोरणानुसार कारवाई करत आहे.” त्यांनी अमेरिकेला आता कठोर निर्णय घेण्याचा सल्ला दिला.